डिझेल महाग; पेट्रोल स्वस्त

petrol
नवी दिल्ली- पेट्रोलच्या किमतीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपन्यांनी १.८२ पैशांनी कपात केली असून डिझेलच्या किमतीमध्ये ५० पैशांनी वाढ केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती कमी झाल्याने कंपन्यांनी लिटरमागे १.५२ पैशांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात स्थानीक कर आणि अन्य कर वगळून ही कपात १.८२ असेल.

याच बरोबर विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये १९ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षाला १२ सिलिंडरनंतर घेतल्या १३व्या सिलिंडरसाठी ९२० ऐवजी ९०१ रुपये द्यावे लागतील.

भारतातील सर्वात मोठ्या तेल पुरवठा करणा-या इंडियन ऑइलने सार्वजनिक उपक्रमासाठी सरकारकडून खरेदी करण्यात येणा-या डिझेलच्या किमतीमध्ये लिटरमागे १.३२ रुपयांची कपात केली आहे.

Leave a Comment