गोव्याच्या राज्यपालपदी मृदृला सिन्हा विराजमान

mridula
पणजी – मुंबईतील राजभवन येथे गोव्याच्या नवनिर्वाचित राज्यपाल मृदृला सिन्हा यांनी रविवारी राज्यपालपदाची शपथ घेतली. सिन्हा यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहित शाह यांनी राज्यपालपदाची शपथ दिली.

यावेळी गोव्याचे मु्ख्यमंत्री मनोहर पार्रिकर आणि इतर मान्यवर मंडळी या सोहळ्यास उपस्थित होती. चार जुलै रोजी बी.व्ही. वांचू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सिन्हा यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

७१ वर्षीय सिन्हा गोव्याच्या पहिल्या पूर्णवेळ महिला राज्यपाल ठरल्या आहेत. केंद्रीय सामाजिक कल्याण विभागाच्या त्या माजी प्रमुख राहिल्या आहेत. तसेच भाजपच्या महिला मोर्चा संघटनेच्या माजी अध्यक्षा आहेत. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील समग्र क्रांती चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सिन्हा या राजकीय व्यक्ती असण्यासोबतच हिंदी भाषेतील लेखिकाही आहेत. त्यांनी आतापर्यंत ४६ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

Leave a Comment