केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ!

increment
नवी दिल्ली – केंद्र सरकार सध्या केंद्रीय कर्मचा-यांना मिळत असलेल्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार करत असून सात टक्क्यांच्या वाढीनंतर महागाई भत्त्याचा दर १०७ टक्के होईल. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यास याचा फायदा ३० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५० लाख निवृत्तीवेतनधारकांना होऊ शकतो.

एक जुलै २०१३ ते ३० जून २०१४ दरम्यान औद्योगिक कामगारांसाठी किरकोळ महागाईचा दर ७.२५ टक्के इतका राहिला असल्यामुळे सरकार कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.

एक जुलैपासून महागाई भत्त्यात सात टक्के वाढ देण्यात यावी असा प्रस्ताव लवकरच अर्थ मंत्रालय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे.

याआधी एक जानेवारी २०१४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकालात महागाई भत्ता १० टक्क्यांनी वाढवून १०० टक्के करण्यात आला होता.

Leave a Comment