इंग्लंडवर टीम इंडियाचा शानदार विजय

raidu
नाटिंगहॅम – भारताने केवळ चार गडी गमवून आणि ४२ चेंडू राखून तिस-या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या २२८ धावांचे आव्हान पार केले. पाच सामन्यांच्या मालिकेत या विजयासह भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडने प्रथम फलंदाजीकरत भारतासमोर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताची सुरुवात खराब झाली असली तरी मधल्या फळीतील फलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. भारताकडून अंबाती रायडू याने नाबाद ६४ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे याने ४५, सुरेश रैना याने ४२, विराट कोहली याने ४० धावा केल्या.
तत्पूर्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अॅलिस्टर कुक आमि अलेक्स हेल्स यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागिदारीकरुन इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर याला सुरेश रैनाने ४२ धावांवर बाद करुन भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कुकला रायडूने ४४ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ जडेजाने ज्यो रुटला दोन धावांवर बाद इंग्लंडची अवस्था तीन बाद ९७ अशी केली.

इयॉन मॉर्गन याला आर.अश्विनने १० धावांवर बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. इयन बेल याला शामीने २८ धावांवर धावाबाद केले. बेल बाद झाला तेव्हा इंग्लंडची अवस्था पाच बाद १३८ अशी झाली होती. त्यामुळे भारत इंग्लंडचा डाव २००च्या आत गुंडाळेल असे वाटत असतानाच जोस बटलर याने ४२ धावा केल्या. तर अखेरच्या काही षटकांमध्ये जेम्स ट्रेडवेल याने केलेल्या फटकेबाजीमुळे इंग्लंडला २२७ पर्यंत मजल मारता आली.

भारताकडून अश्विनने तीन तर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, सुरेश रैना, रायडू आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

Leave a Comment