लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचले बच्चन कुटुंबिय

bacchan1
मुंबई : लालबागच्या राजाचे महानायक अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या बच्चनसह दर्शन घेतले.
bacchan
शनिवारी संध्याकाळी बच्चन कुटुंबिय राजाच्या आरतीत सहभागी झाले. मात्र यावेळी जया बच्चन आणि आराध्या हजर नव्हत्या. यावेळी अभिषेक बच्चन पठाणी सूट आणि गुलाबी नेहरू जॅकेटच्या पेहरावात दिसला. तर ऐश्वर्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसली. आपण १९७४ पासून लालबाग राजाच्या दर्शनाला येत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी ट्विटर आणि फेसबुकवर म्हटले आहे.
bacchan2