‘आप’च्या २०० कार्यकर्त्यांचे सामुहिक राजीनामे

aap
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने आधीच घेतलेला असल्यामुळे आता पक्षातले चैतन्य कायम ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना पावले उचलावी लागणार आहेत. पक्षाशी पहिल्यापासून निगडीत असलेल्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी, आज सामूहिकरित्या राजीनामे दिले आहेत. या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

या कार्यकर्त्यांनी आपचे मुंबईतील नेते मयांक गांधी यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडेही या कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणे घातले होते. मात्र त्याची योग्य दखल घेतली न घेतल्याने आता या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.

Leave a Comment