मोदींच्या जपान दौर्‍यात बुलेट ट्रेनवर चर्चा

bullet
दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौर्‍यावर जाण्यापूर्वीच मुंबई अहमदाबाद या मार्गावर सुरू करण्यात येणार्‍या बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठोस स्वरूप देण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते. या बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानचे सहाय्य मिळणार आहे. त्यामुळे मोदींच्या जपान दौर्‍यात त्यावर चर्चा केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

मुंबई अहमदाबाद हे ५३४ किलोमीटरचे अंतर ही बुलेट ट्रेन ताशी ३०० किमीच्या वेगाने कापणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरूणेंद्रकुमार म्हणाले की जपान मालगाड्या आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सहयोग देणार आहे. यासाठी जी ६२ हजार कोटींची योजना आखली जात आहे तिची व्यवहार्यता तपासून बघण्याच्या कार्यक्रमातही जपान सहभागी आहे. या संबंधीचा शेवटचा अहवाल १५ जूनपर्यंत तयार होईल असा अंदाज आहे.

Leave a Comment