इबोला

ebola
इबोला या व्हायरसने आफ्रिकेच्या पश्‍चिम भागात साथीच्या रोगाचे स्वरूप धारण केले आहे. मात्र ही साथ जगभर पसरून त्यात किमान २० हजार लोक मरण पावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही तसा इशारा दिला आहे. मात्र याचबरोबर ही साथ पसरू नये यासाठीही अनेक उपाय योजिले जात आहेत. त्यासाठी तीन महिन्यांचा एक कार्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. या कालावधीत सर्व प्रकारची स्थलांतर थांबविली जातील.

आजपर्यंत इबोलामुळे आजारी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. ती तीन हजारांवर गेलेली आहे आणि त्यातील १५५२ लोक मरण पावले आहेत. आफ्रिकेच्या पश्‍चिम भागातील गिनीया, लायबेरिया, सियारा लेओने आणि नायजेरिया या देशातील लोकांचा या मृतांत समावेश आहे. आगामी काही दिवसात आफ्रिकेच्या ज्या भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरे होतात त्या भागात रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने एबोलाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा कार्यक्रम आखला आहेच, पण तो नीट अमलात आल्यास त्यावर नियंत्रण येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही