सॅमसंगचा गॅलेक्सी एस ५ मिनी ड्युओस फ्लिपकार्टवर विक्रीला?

samsung
कोरियन जायंट सॅमसंगने अन्य स्मार्टफोन कंपन्यांप्रमाणेच आपली उत्पादने विकण्यासाठी भारतातील सर्वात मोठी ई रिटेल कंपनी फ्लीपकार्टची निवड केली असल्याचे वृत्त आहे. फ्लिपकार्टने फेसबुकवर नुकत्याच केलेल्या जाहिरातील कमिंग सून म्हणून गॅलेक्सी एस ५ मिनी ड्युओस चा उल्लेख केला असला तरी हा फोन कोणत्या तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार याचा खुलासा केलेला नाही.

गेल्याच महिन्यात सॅमसंगने गॅलेक्सी एस ५ मिनी सादर होत असल्याची घोषणा केली होती. मिनी एस पाच ड्युओस हाही मिनी एस ५ प्रमाणेच हार्ट रेट सेन्सर, फिंगरप्रिंट स्कॅनर, अन्य वेअरेबल डिव्हायसेस, किडस मोड, धूळपाण्यापासून संरक्षित अशी वैशिष्ठ्ये असलेला स्मार्टफोन आहे. त्याला ४.५ इंची स्क्रीन, ४.४ किटकॅट, ८ मेगापिक्सलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा, २.१ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशाही सुविधा आहेत. या स्मार्टफोनचे वजन आहे केवळ १२० ग्रॅम.

Leave a Comment