जन धन योजनेअंतर्गत १.५ कोटी खाती सुरू

jan-dhan-yojana
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जन धन योजना गुरुवारी देशभरात सुरु झाली. वंचित घटकाला बँकिंग सेवेची जोडण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या योजनेंतर्गत पहिल्याच दिवशी देशभरात १.५ कोटी खाती सुरू झाली असून हा जागतिक विक्रम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या योजनेंतर्गत २६ जानेवारी २०१५पर्यंत ७.५ कोटी लोकांना झीरो बॅलन्स खात्याबरोबरच रुपे डेबिट कार्ड, १ लाख रुपयांच्या अपघात विम्याबरोबरच ३०,००० रुपयांचे आयुर्विमा संरक्षण देण्यात आले असल्याचे मोदी म्हणाले. याबरोबरच कालांतराने खातेधारकांना ५००० रुपयांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीही पुरवली जाणार आहे. या योजनेंतर्गत आयसीआयसीआय बँकेने एक लाख खाती सुरू केल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment