लंडन – दुस-या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंड संघातील प्रत्येक क्रिकेटपटूच्या मानधनातून दहा टक्के तर, कर्णधार अॅलिस्टर कूकच्या मानधनातून २० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंड संघाला दंड
हा दंड आयसीसीचे सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी ठोठावला आहे. पन्नास षटके पूर्ण करण्यासाठी इंग्लंड संघाने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतल्याने हा दंड ठोठावण्यात आला. सामन्यात मिळणारा अतिरिक्तवेळ विचारात घेऊनही इंग्लंड संघाला षटके पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागला.
आयसीसीच्या अचारसंहितेनुसार प्रत्येक षटक पूर्ण करण्यासाठी एक वेळ निर्धारित आहे. त्या वेळेत ते षटक पूर्ण झाले नाही तर, खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून दहा टक्के तर, कर्णधाराच्या मानधनातून वीस टक्के रक्कम कापून घेण्याची तरतूद आहे.