लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार कृष्णा कल्ले यांना जाहीर

kalle
मुंबई – ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

आकाशवाणीवर ‘अ’ श्रेणी गायिका म्हणून कल्ले यांनी १९६० पासून काम केले. तर हिंदीतील २०० आणि मराठीतील १०० चित्रपटगीतांना त्यांनी आवाज दिला. त्यांनी १००हून अधिक भजने, भक्तीगीते व गजला गायल्या आहेत.

जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते कल्ले यांना युथ फेस्टिवल पुरस्कार तर १९५७ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते गायनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १९५८मध्ये अखिल भारतीय सुगम संगीताचे पहिले पारितोषिक, सेहगल मेमोरीयलतर्फे देण्यात येणारा गोल्डन व्हॉईस पुरस्कार, पी. सावळाराम प्रतिष्ठान आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘गंगा जमुना पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Leave a Comment