हजसाठी यंदा भारतातून १.३६ लाख यात्रेकरू

hajj
जेद्दा – यावर्षी हज यात्रेसाठी भारतातून १ लाख ३६ हजार यात्रेकरूंनी नोंदणी केली असून त्यांची सर्व व्यवस्था केली गेल्याचे सौदी सरकारने जाहीर केले आहे. हज यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दक्षिण आशियाई देशातून यंदा ४ लाख १० हजार भाविक सौदीत जाणार आहेत.सौदीचे वाणिज्य सचिव इरशाद अहमद म्हणाले की भारत सरकारकडून आमच्याकडे १लाख ३६ हजार यात्रेकरू येत असल्याचे कळविले गेले आहे. त्यातील पहिली तुकडी आज कोलकाता येथून रवाना होत आहे ती मदिनेस जाणार आहे. जेद्दा साठी पहिले विमान महाराष्ट्रातील औरंगाबाद विमानतळावरून ७ सप्टेंबरला उड्डाण करणार आहे.

यंदा सर्वच यात्रेकरूंसाठी आधुनिक संदेशवहन व्यवस्था केली गेली आहे.भारतीय यात्रेकरूंना भारतीय हज मिशनने इंटरनेटवर आधारित स्मार्टफोन अॅप उपलब्ध करून दिले आहे. इंडियन हाजी अॅकोमोडेटर लोकेटर नावाचे हे अॅप यात्रेकरूंना आपला ठावठिकाणा समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. भारतीय यात्रेकरूंना सौदीत पोहोचताच सौदीची मोबाईल सिम दिली जाणार आहेत असेही समजते.

Leave a Comment