लालूप्रसाद यादव यांच्यावरील ह्रदयशस्त्रक्रियेस सुरूवात

lalu-prasad
मुंबई : मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टियूटमध्ये राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर आज सकाळी ह्रदयशस्त्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया दिवसभर सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.

मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टियूटमध्ये प्रकृती अस्वस्थामुळे लालूप्रसाद यादव यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. काल दिवसभर त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रूग्णायातील एमडी डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली लालूप्रसाद यादव यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

Leave a Comment