मोबाईलने होणार इंटरनेटशिवाय बँक व्यवहार

mobile-banking
नवी दिल्ली – केंद्र सरकार लवकरच मोबाइल बॅंकिंग आता आणखी सहज आणि सोपे करणार असून इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोन मोबाईलशिवाय केवळ एसएमएसद्वारे फंड ट्रान्सफर, बॅलेंस इन्क्वायरी, पिन नंबर बदलणे, मिनी स्टेटमेंट, चेक बुक रिक्वेस्ट यासारखी कामे केली जाणार आहेत. बहुतेक टेलिकॉम कंपन्या यासाठी तयार झाले आहेत. केंद्र सरकार लवकरच याप्रकारच्या बॅंकिंग सिस्टमची अधिकृत घोषणा करणार आहे.

अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून १० टेलिकॉम कंपन्या पेमेंट गेटवे ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच एनपीसीआय सोबत चर्चा करीत आहे. ही सुविधा टेलिकॉम कंपन्यांच्या USSD चॅनेलवरून चालणार आहे. USSD एक प्रॉटोकॉल आहे ज्याद्वारे जीएसएम सेल्युलर टेलिकॉम कंपन्या सर्विस प्रोवायडर कंपन्यांसोबत संचार करते. इस चॅनेलच्या माध्यमातून ग्राहक एका सामान्य टेक्स्ट मॅसेजद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्ड ट्रान्जेक्शन करू शकणार आहे. याशिवाय कमी रक्कमेच्या बिलावर पेमेंट करण्याची सुविधा असणार आहे.

Leave a Comment