मुंबई – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर मुंबईतील एशियन रुग्णालयात आज यशस्वीपणे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.
यशस्वी झाली लालू्प्रसाद यांच्यावरील हृदय शस्त्रक्रिया
ही शस्त्रक्रिया सहा तास पंधरा मिनिटे सुरु होती. त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट, आर्टिक रिपेअर आणि हृदयातील तीन मिमी होल रिपेअर या तीन शस्त्रक्रिया निष्णात डॉ. रमाकांत पांडा यांच्या देखरेखीखाली पार पडल्या.
आज सकाळी लालूप्रसाद यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडावी यासाठी पटना येथील कार्यालयात आरजेडीच्या नेत्यांनी विशेष हवन केले होते.
सोमवारी लालूप्रसाद यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य तपासणीच्या अहवालानंतर डॉक्टरांनी हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता.