‘एअर इंडिया डे’ निमित्त १०० रूपयात विमान प्रवास

air-india
मुंबई – विमान वाहतूक कंपन्यांकडून सवलतीच्या ऑफर्सचा धडाका सुरू असून आता स्पाइसजेट नंतर एअरएशिया इंडिया आणि आता ‘एअर इंडिया डे’ निमित्त एअर इंडियाच्या वतीने मर्यादित कालावधीसाठी १०० रूपयात विमान प्रवासाची सवलत जाहीर केली असून २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीसाठीच ही सवलत लागू असणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे एअर इंडिया डे’ दिवस साजरा करण्यात येत आहे.

एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे २७ ऑगस्ट २००७ रोजी विलिनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर एअर इंडिया ही नवी कंपनी अस्तित्वात आली. या दिनाचे औचित्य साधून कंपनीने फक्त १०० रूपयांत विमान प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. त्यासाठी २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत कंपनीच्या संकेतस्थळावर बुकींग करता येईल. याशिवाय ‘एअर इंडिया डे’ निमित्त कंपनीच्या काही कर्मचा-यांचा यावेळी सन्मानही करण्यात येणार आहे.

Leave a Comment