हिंदुजा ग्रुप भारतात १० अब्ज डॉलर्स गुंतवणार

hinduja
हिंदुजा ग्रुप ने भारतातील अपूर्ण अवस्थेत असलेले वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधा प्रकल्पात १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे भारताच्या आर्थिक विकास दर वाढीस चालना मिळणार आहे असे हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीज चे सहअध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे म्हणणे आहे.

गोपीचंद हिंदुजा म्हणाले की भारतात स्टेट बँकेने आर्थिक सहाय्य केलेले अनेक प्रकल्प इंधन नाही वा तत्सम अनेक कारणांनी रेंगाळले आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी दिलेले कर्ज बॅड लोन झाले आहे. नव्याने सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेग पकडताना दिसत आहे. त्यामुळे भारताकडून अशा अपूर्ण प्रकल्पात गुंतवणुकीसाठीची त्वरीत परवानगी देण्याची हमी दिली गेली तर यूके सरकार अन्य कंपन्यांनाही भारतातील प्रकल्पात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देऊ शकेल. येत्या दोन वर्षात असे अपुरे प्रकल्प म्हणजे वीज निर्मिर्ती, रस्ते, पूल बांधकामे पूर्ण झाले तर भारतासाठीही ते फायद्याचे ठरणार आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. येथील न्यायव्यवस्था तसेच कायदा सुव्यवस्था चांगली आहे आणि नव्या सरकारने संरक्षण आणि विमा क्षेत्रात ४९ टक्के थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी देऊन चांगला निर्णय घेतला आहे व याचा फायदा ब्रिटनने उठवायला हवा असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. हिंदुजा ग्रुपचे भारतातील गुंतवणुकीस प्रथम प्राधान्य राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment