गृहकर्जाच्या ईएमआयचे ओझे होणार हलके

home-loan
नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने ०.०५ पासून ०.१५ टक्क्यांपर्यंत व्याजदर कमी केले असून एसबीआयचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. ७५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर १०.१० टक्के दर, तर ७५ लाखांपेक्षा जास्तच्या गृहकर्जासाठी १०.१५ टक्के व्याजदर लावण्यात आले आहे. हे नवे दर सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी एकसारखे लागू होणार आहेत. एसबीआयच्या या निर्णयाने घर विकत घेण्याची तयारी करत असलेल्या लोकांना थोडा दिलासा मिळू शकतो.

गृहकर्जावरील व्याज दर बँकांकडून कमी केल्याने बांधकाम क्षेत्र वेग घेऊ शकतो. याबद्दल अंतरिक्ष ग्रूपचे संचालक राकेश यादव म्हणाले की हे एक चांगले पाऊल असल्यामुळे घर घेणार्‍यांना फायदा होईल आणि ईएमआयचे ओझे सुध्दा थोडे हलके होईल. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याने मागणी वाढेल आणि फ्लॅटच्या विक्रीमध्ये वाढ होईल.

Leave a Comment