ऑनलाइन खरेदीसाठी दोनदा होणार खातरजमा

credit-card
नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन खरेदी व्यवहार केल्यास दोन वेळा खातरजमा (व्हेरिफिकेशन) करण्याचे स्पष्ट केले असून क्रेडिट कार्डद्वारे करण्यात आलेल्या ऑनलाइन व्यवहारासाठी आता दोनदा खात्री करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या वेळी पासवर्ड किंवा कार्डवर नमूद नसणारी तत्सम माहिती भरण्याची सूचना होणार आहे. ही माहिती भरल्यानंतरच व्यवहार पूर्ण होईल, असे आरबीआयने स्पष्ट केले.

त्याचबरोबर क्रेडिट कार्डच्या रकमा रुपयात देता येतील, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. मात्र ही रक्कम कोणत्या तरी बँकेच्या माध्यमातून भरणे आवश्यक आहे. तसेच भारतातील देणी फेडण्यासाठी इतर देशाच्या चलनाचा वापर करणे फेमा कायद्याचे उल्लंघन ठरेल, असा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. अशा आशयाचे निर्देश आरबीआयने यापूर्वीही दिले होते, मात्र त्याचे पालन न झाल्याने नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. हे निर्देश तत्काळ लागू झाले असून यापूर्वी झालेल्या व्यवहारांबाबत काही वाद झाल्यास त्याच्या पूर्ततेसाठी ३१ ऑक्टोबर २०१४ पर्यंत मुदत दिली आहे.

Leave a Comment