आता चक्क ६०० रुपयांत करा विमान प्रवास

air-aisa
नवी दिल्ली – आपल्याला विमान प्रवास करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण करणार आहे डोमेस्टिक विमान प्रवासामध्ये नव्यानेच पाऊल ठेवलेली कंपनी एअरएशिया इंडिया. त्यांनी चक्क ६०० रुपयात विमान प्रवास करायची संधी उपलब्ध करून दिली आहे.

२६ ऑक्टोबर २०१४ पासून २४ ऑक्टोबर २०१५पर्यंत विमान कंपनीच्या ऑफर नुसार तुम्ही हा विमान प्रवास करू शकता, पण ही सेवा प्राप्त करण्यासाठी तिकीटांचे आरक्षण मात्र 31 ऑगस्ट 2014पर्यंतच करायचे आहे.

कंपनीने बंगळुरूपासून चेन्नई आणि कोच्चीसाठी विमान प्रवासाचे भाडे ६०० रुपयांपासून सुरू केले असून बंगळुरू ते गोवासाठी तिकीट असेल ९०० रुपये. तर बंगळुरू, चंदीगढ आणि जयपूरसाठी तिकीटाची किंमत १९०० पासून सुरू असले.

एअरएशिया इंडिया सध्या बंगळुरू ते चेन्नई, कोच्ची आणि गोवासाठी प्रवास करतात. लवकरच देशातील इतर शहरांदरम्यान कंपनी विमान सेवा सुरू करेल.

Leave a Comment