आकाशकंदिलांनी उजळले सिंगापूरचे चायना टाऊन

singapur
दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात चीन आणि सिंगापूर व आसपासच्या भागात साजरा केला जाणारा दिपोत्सव २४ ऑगस्टपासून सुरू झाला असून तो २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

भारतात ज्याप्रमाणे नवीन धान्य आणि प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी साजरी केली जाते त्याच धर्तीवर चीन आणि आसपासच्या भागात हा दिपोत्सव मिड ऑटम फेस्टीव्हल म्हणून साजरा गेला जातो. सिंगापूरमधील चायना टाऊन असेच आकाशकंदिलांनी नुसते झगमगू लागले आहे. घराघरातून तसेच रस्त्यांवरही अनेक सुंदर आकारातील आकाशकंदिल लटकविले गेले आहेत आणि एकूण वातावरणात आनंदी आनंद पसरला आहे.

या सणासाठी शक्यतो हातानेच मोठमोठे विविध आकारांचे नयन मनोहर आकाशकंदिल बनविण्याची प्रथा आहे. या काळात नातेवाईक, मित्रमंडळी एकमेकांकडे विविध फराळाचे पदार्थ भेटीदाखल नेतात आणि सणाच्या शुभेच्छा देतात. सार्वजनिक पातळीवरही अनेक कार्यक्रमांचे आयोजन या काळात केले जाते. लँटर्न फेस्टीव्हल म्हणूनही हा सण ओळखला जातो. चीनी फटाक्यांचे सरच्या सर या काळात उडविले जातात आणि त्या फटक्यांच्या रोषणाइचा आनंद आबालवृद्ध लुटत असतात. खरेदीला जोर येतो आणि भेटवस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.

Leave a Comment