ऑटोमोबाईल्स कंपन्यांना सीसीआयचा दणका

automobiles
नवी दिल्ली : भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) व्यापार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी टाटा मोटर्स, मारूती सुझुकीसह १४ मोटार उत्पादक कंपन्यांना दणका देत २,५४५ कोटी रूपयांचा दंड आकारला आहे.

टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, होंडा, फोक्सवॅगन, फियाट इंडिया, बी. एम. डब्ल्यू, फोर्ड इंडिया, जनरल मोटर्स, हिंदुस्थान मोटर्स, महिंद्रा ऍन्ड महिंद्रा, मर्सिडीज बेंज, निसान मोटर्स, स्कोडा मोटर्स आणि टायोटा या कंपन्यांना आयोगाने केलेल्या चौकशीत व्यापार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरविले असून स्थानिक मुळ उपकरणांच्या विक्री प्रकरणात डिलरसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत २,५४५ कोटी रूपयांचा दंड या कंपन्यांना आकारण्यात आला आहे. आदेश प्राप्त होताच ६० दिवसांच्या आत दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश आयोगाने या कंपन्यांना दिले आहेत.

Leave a Comment