सूर्यकांता पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठी

patil
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णय घेतला असून राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्य सूर्यकांता पाटील या होत्या.

राष्ट्रवादीत शरद पवार यांचे फारसे काही चालत नसल्याचा आरोप सूर्यकांता पाटील यांनी केला. तसेच पवारांच्या अनुपस्थितीत अनेक निर्णय परस्पर घेतले जात असल्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्लाही सूर्यकांता पाटील यांनीही दिला होता.

राष्ट्रवादीने सूर्यकांता पाटील यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती. शिवाय विधानपरिषद निवडणुकीतही त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द करण्यात आल्यामुळे सूर्यकांता अनेक दिवसांपासून नाराज होत्या.

दरम्यान सूर्यकांता पाटील यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मात्र स्तुती केल्यामुळे सूर्यकांता पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

Leave a Comment