मोदींच्या काळय़ा पैशाविरोधी मोहिमेला यश

swiss-bank
नवी दिल्ली – भारतीय अधिका-यांना स्वीस बँकेने परदेशात काळा पैसा साठविलेल्यांची नावे दिल्यामुळे बेकायदेशीर मार्गाने विदेशात नेण्यात धनाचा शोध लागण्यास मदत होणार असून मोदी सरकारने आखलेल्या काळय़ा पैशाविरोधी मोहिमेला प्राथमिक यश प्राप्त झाले आहे.

ही माहिती मिळण्यात स्वित्झर्लंडमधील नियम आणि गुप्ततेचे कायदयामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रत्यक्ष कर मंडळ आणि प्राप्तीकर विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांना काहीसे यश मिळाले असून स्वीस बँकेने काही खातेदारांची नावे भारतीय अधिका-यांना दिली आहेत. त्यांच्या खात्यावर असणारी रक्कम फार मोठी नसली तरी भविष्यकाळात ही मोहिम अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने हे यश महत्वाचे आहे, असा दावा करविभागाने केला आहे.

न्या. एम. बी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने समिती स्थापन केली असून ही समिती काळे धन भारतात परत कसे आणता येईल, यासंबंधी विचार करणार आहेत.

Leave a Comment