मुंबई; गॅस सिलेंडरच्या स्फोटात १ ठार

blast
मुंबई – मुंबईतील चेंबुरमध्ये सकाळी सातच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटात १ जण ठार झाला आहे. तसेच १० जण जखमी झाले आहेत.

चेंबूरच्या टिळकनगरमधील पी.एल.लोखंडे मार्गावरील संदीप कॉलनी परिसरातील एका घरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात महेश जगताप या व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. तर सात महिला आणि तीन पुरूष जखमी झाले असून जखमींमधील दोन महिलांची स्थिती गंभीर असल्याचे समजते आहे. सर्व जखमींना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment