अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात तुकारामांचे वंशंज

sadanand-more
पुणे : भाषा आणि संस्कृतीच्या भिंती भेदत आपल्या संतवाणीचे सूर नामदेवांनी थेट घुमानमध्ये पोहोचवले होते. याच संतभूमीत यंदाचे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संत साहित्याचे गाडे अभ्यासक व संत तुकारामांचे वंशंज सदानंद मोरे यांनी उडी घेतली आहे.

या निवडणुकीत ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबणीस, साहित्यिक भारत सासणे हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्यामुळे डॉ. मोरे यांच्यासमोर सबणीस आणि सासणे यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे.

घुमानमधील कडाक्याची थंडी लक्षात घेता संमेलनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे हे संमेलन एप्रिलमध्ये संमेलन पार पडणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आणखी कोण कोणत्या साहित्यिकांची नावे पुढे येत आहे.

दरम्यान संत नामदेवांच्या कर्मभूमीत संत तुकारामांचे वंशज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होणार का, हे पाहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment