या बुद्धविहारात महिलांना आजही प्रवेश नाही

buddha
जपान – जगभर आज स्त्री आणि पुरूष या दोघांनाही समान अधिकार असल्याचे म्हटले जात असले तरी देखील काही ठिकाणी आजही महिलांना पाहिजे तसे वाव दिला जात नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे १३०० वर्षापूर्वीच्या जपानच्या एका विहारामध्ये आजही महिलांना प्रवेश नाकारला जातो.

जपानच्या दुर्गम भागात एक बुद्धविहार असून या विहारात आजही महिलांना प्रवेश दिला जात नसून या बुद्धविहाराचे नाव आहे ‘माऊंट ओमिनी’. ‘महिलांना प्रवेश निषिद्ध’ अशा प्रकारची पाटी विहाराच्या प्रवेशद्वारावरच लावली आहे. याविरोधात जपानच्या महिला संघटनांनी आवाज उठविला होता. मात्र धार्मिक परंपराच्या नावाखाली महिला संघटनेची ही मागणी धुडकवून लावली.

या विहाराला जपानच्या सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून ओळखले जात असून या पर्यटन स्थळाचा महिलांना मात्र आनंद घेता येत नाही.

Leave a Comment