पाचपुते, गावितांच्या पक्ष प्रवेशाला भाजपचा विरोध

combo
मुंबई – भाजपमध्ये लवकरच राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते प्रवेश करणार असल्याची चर्चा असून या नेत्यांच्या प्रवेशाला भाजपमधील एका गटाने ठाम विरोध दर्शविला आहे.हे दोन नेते आहेत माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित आणि माजी आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते.

भाजपमधील या गटाचे म्हणणे आहे की ज्यांच्या विरोधात विधिमंडळात आणि सभागृहाबाहेर आंदोलने केली आता त्यांच्यासाठीच मते मागावी लागणार आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित यांनी भाजपकडून विजय मिळवल्यानंतर विजयकुमारांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र आपल्या आध्यात्मिक गुरूंकडून मुहूर्त ठरल्यानंतरच पक्षात प्रवेश करणार अशी भूमिका गावित यांनी घेतल्यामुळे अजूनही त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षनेतृत्वावर आरोप करत बाहेर पडलेले बबनराव पाचपुते हेसुद्धा भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी जरी पाचपुतेंच्या प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवला असला तरी पहलि्या फळीतील नेत्यांचा एक गट आणि अहमदनगरमधील स्थानिक भाजप नेत्यांनी मात्र पाचपुतेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे.

Leave a Comment