आता सुसाईड टूरिझमची क्रेझ

suiside
लंडन – रोजच्या धकाधकीतून चार दिवस मोकळे काढून पर्यटनाचा आनंद लुटण्यामागे बहुतेक पर्यटकांचा उद्देश दमलेले शरीर आणि मन यांना विरंगुळा मिळावा आणि ताजेतवाने वाटावे असा असतो. पर्यटन ही हौस न राहता व्यवसाय बनल्यानंतर मात्र त्याच्या अनेक शाखा उदयास आल्या आहेत आणि त्या लोकप्रियही होत आहेत. मेडिकल टूरिझम, धार्मिक टूरिझम, अध्यात्मिक टूरिझम असे विविध प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ लागले असताना सुसाईड टूरिझमची लोकप्रियताही वेगाने वाढत चालल्याचे ब्रिटीश संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.

स्वित्झर्लंड या सुसाईड टूरिझमसाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे आणि या पर्यटनात जर्मन आणि ब्रिटीश नागरिकांनी आघाडी घेतली आहे. गेल्या चार वर्षात सुसाईड पर्यटकांची संख्या दुप्पट झाली असल्याचेही या संशेाधनांत दिसून आले आहे. भारतातील पहिली सुसाईड टूरिझमची केस २०१२ साली घडली. असाध्य रोगांनी आजारी असलेल्या व्यक्तींमध्ये हा ट्रेंड अधिक असल्याचे आढळले आहे.

सुसाईड टूरिझमची वाढती क्रेझ लक्षात घेऊन या पर्यटकांनाही अन्य पर्यटकांप्रमाणेच सेवा पुरविल्या जाव्यात अशी मागणीही केली जात असून स्वित्झर्लंडमध्ये चार संस्था ही सेवा देतात असेही समजते. स्वित्झर्लंडच्या झुरीच मध्ये आत्महत्या हा गुन्हा नाही. तसा कोणताही कायदा तेथे नाही. उलट सहा संस्था आत्महत्त्या करणे हा नागरिकांचा हक्क मानला जावा असे समर्थन करत आहेत. त्यातीलच चार संस्था आत्त्महत्येसाठी सेवा देतात. जगभरही आत्महत्या हा गुन्हा मानला जाऊ नये यासंदर्भात चर्चा सुरू आहेतच. आत्तापर्यंत ६०० पेक्षा अधिक लोकांनी सुसाईड टूरिझमचा आधार घेतला असून त्यात जर्मनीतील २६८ तर ब्रिटनमधील १२६ जणांनी आत्महत्या करून मुक्तता मिळविली आहे.

Leave a Comment