सेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

party
वसमत – हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथे आज शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली आहे असून येथे ही धुमश्चक्री शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचे नेते कार्यक्रमात आल्याने केली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा या दोन्हीं नेत्यांचे समर्थक एकमेकांना भिडले असून यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

हिंगोली शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव याच्या सभेत पक्ष विरोधात काम करणाऱ्यांना स्टेजवर जागा का दिली या मुद्द्यावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक चर्चा आहे.

Leave a Comment