दूरदर्शनकडे एबीयू-रोबोकॉन 2014 आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद

abu
येत्या 24 ऑगस्टला माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार स्पर्धेचे उदघाटन

पुणे – तेराव्या एबीयू आशिया-पॅसिफिक रोबो (यंत्रमानव) स्पर्धेचे उदघाटन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुणे येथे येत्या 24 ऑगस्टला होणार आहे. एबीयू-रोबोकॉन 2014 या स्पर्धेचे आयोजन दूरदर्शनने केले असून 22 ते 26 ऑगस्ट या कालावधीत ती बालेवाडी क्रीडा संकुलातल्या बॅडमिंटन हॉलमध्ये भरत आहे.

एबीयू-रोबोकॉन हा एक आगळावेगळा दूरचित्रवाणी कार्यक्रम उपक्रम असून यात विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या यंत्रमानवांची स्पर्धा असते. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातल्या अभियांत्रिकीच्या पदवीपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीला चालना देणे, हा या स्पर्धेमागचा हेतू आहे. तसेच अशा प्रकारचे उपक्रम प्रसारण संस्थांना आपले तांत्रिक कौशल्य अधिक प्रगत करण्याची तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याची संधी देतात.

यंदाच्या स्पर्धेत 17 देश सहभागी होत आहेत. जपान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, रशिया स्टेट टीव्ही आणि ब्रॉडकास्टिंग कंपनी आणि इजिप्शिअन रेडिओ अँड टेलिव्हिजन युनियन यात सहभागी झाले आहेत.

यंदाच्या स्पर्धेची संकल्पना “पालकत्वाला सलाम” अशी आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीव्हीआरआय इंडोनेशिया आणि प्रसारभारती यांच्यात आज प्रसारण क्षेत्र आणि कार्यक्रम तसेच बातम्या यासंदर्भातील देवाण-घेवाण याबाबत सहकार्यासाठी बैठक होणार आहे.

एबीयू-रोबोकॉन ही स्पर्धा आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (एबीयू) आणि तिच्या सदस्य देशांद्वारे आयोजित केली जाते.

Leave a Comment