अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात अनेक नागरिकांनी रात्रीच्या आकाशात झगमगती वर्तुळाकार वस्तू विविध रंगी प्रकाश फेकत प्रवास करत असल्याचे दृष्य पाहिले आणि ती उडती तबकडी आहे अशी वार्ता पाहता पाहता सोशल नेटवर्कवर पसरत गेली. या तबकडीचे अनेकांनी काढलेले फोटो आणि व्हीडीओही सोशल मिडीयावर झळकले आणि त्यात ह्युस्टन येथील संगीतकार अँड्रू पेना याचा व्हीडीओ सर्वोत्तमही ठरला असल्याचे वृत्त आहे.
टेक्सास मध्ये दिसली उडती तबकडी
पेनाच्या व्हिडीओत रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करत आकाशातून चाललेल्या या चमकदार वर्तुळाकार वस्तूला अचूक टिपले गेले आहे. मात्र टूटूअल यूएफओ नेटवर्कचे तपास प्रमुख फ्लेचर ग्रे यांनी मात्र ही उडती तबकडी नाही असा निर्वाळा दिला आहे. दुसरीकडे जॉन्सन स्पेस सेंटरमधील अनेकांनी ही तबकडी प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे.