२०१५मध्ये येणार प्लॅस्टिकच्या नोटा

currancy
नवी दिल्ली – पुढील वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्यांसदर्भात विचाराधीन असून शिमलासह पाच राज्यात सुरुवातीला प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मे महिन्यातील मंडळाच्या बैठकीनंतर सांगितले होते.

या प्लॅस्टिकच्या चलनी नोटांच्या वापरास कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वनर आणि शिमला या शहरांमध्ये सुरुवात होणार असून त्यानंतर देशांतील अन्य शहरांमध्ये प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत.

प्लॅस्टिकच्या नोटा या कागदी नोटांप्रमाणे लवकर खराब होत नाहीत तसेच फाटतही नाहीत. तसेच प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्याने नकली नोटांच्या वापरावर काही प्रमाणात आळा बसेल.

Leave a Comment