संगीतावर आणि गप्पांमधून करा सेलफोन चार्ज

music
लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील संशोधकांनी सेलफोन चार्ज करण्यासाठी प्रोटोटाईप पॅनल तयार केले असून त्यामुळे पर्यावरणातील लहरींवर फोन चार्ज होऊ शकणार आहे. या संशोधकांनी असे डिव्हाईस विकसित केले आहे की ज्यात संगीत, जेवताना मारलेल्या गप्पा, वाहतूकीत वाहनांचे आवाज यांच्यापासून वीज निर्मिती होईल व त्यावर सेलफोन चार्ज होऊ शकेल.

संशोधकांनी या उपकरणाचे नांव नॅनो जनरेटर असे ठेवले आहे. त्यात प्लॅस्टीकच्या शीटवर सूक्ष्म झिंक ऑक्साईड चा थर दिला गेला आहे. हे शीट ताणलेल्या अवस्थेत हलले म्हणजेच त्याच्यावर आवाजाच्या लहरी आदळल्या तर त्यापासून वीज निर्मिती होते व फोन चार्ज करता येतो. नोकिया च्या पार्टनरशीपमध्ये संशोधकांनी हे संशोधन केले आहे. यातून ५ व्होल्ट वीज तयार होते व ती सेलफोन चार्ज करण्यास पुरेशी ठरते. या निमित्ताने सेलफोन चार्जिंगचा आणखी एक स्त्रोत मिळाला आहेच तसेच ही प्लॅस्टीक शीट स्वस्तात तयार होते व त्यामुळे त्यासाठी येणारा खर्चही अगदी कमी असेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment