लहान मुलांतील मधुमेह

dibetic
मधुमेह हा विकार आता सामान्य व्हायला लागला आहे आणि त्याबाबतीत भारताची स्थिती फार गंभीर झालेली आहे. कारण इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन या संस्थेने केलेल्या एका पाहणीत भारतात २०३० सालपर्यंत दहा कोटी मधुमेही असतील असा निष्कर्ष निघाला आहे. मधुमेह हा मोठ्या माणसाचा विकार आहे असा आपला समज असतो, परंतु आपल्या देशात सध्या लहान मुले या विकाराला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. टाईप-१ डायबेटिस या मधुमेहाचे दहा लाख बालरुग्ण आपल्या देशात आहेत.

हा लहान मुलांतला मधुमेह इन्शुलिन्सचा वापर न केल्यास घातक ठरू शकतो. या विकाराचा त्रास १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना अधिक प्रमाणात होतो. ० ते ४ या वयोगटात या विकाराचा त्रास होत नाही. परंतु ४ ते १० या वयातील मुलांना त्यातल्या त्यात कमी, परंतु त्रास होतो. साधारणपणे फळे कमी खाणे, भाज्या न खाणे, चरबीचे अधिक प्राशन आणि अनारोग्यकारक आहार घेणे यामुळे या मुलांना मधुमेह होतो. या गोष्टी टाळल्या तर लहान मुलाचे अशा विकारांपासून सुटका होऊ शकते.

लहान मुलांमध्ये मधुमेहाचा प्रादुर्भाव होत आहे याची खूण काय, असा प्रश्‍न विचारला जातो. मात्र त्याच्या काही खुणा आहेत. लहान मूल अधिक पाणी प्यायला लागले, वारंवार लघवीला जायला लागले, त्याचे वजन वाढले आणि त्याला वारंवार भूक लागायला लागली की, त्याचे रक्त आणि लघवी तपासून बघावी. पालकांपैकी कोणाला मधुमेह असेल तर ही चाचणी जरूर करावी. मुळात त्याला मधुमेह होऊच नये यासाठी खालील दक्षता घ्यावी.

त्याच्या वजनावर नियंत्रण ठेवावे, वारंवार वजन तपासून बघावे – आपले मूल खेळामध्ये, व्यायामामध्ये किंवा जास्त हालचाली होतील अशा कोणत्याही उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असा कटाक्ष ठेवावे – मुलाला भाज्या आणि फळे खाण्यास प्रोत्साहन द्यावे – जंकफूड खाण्यापासून परावृत्त करावे – दोन जेवणाच्या मध्ये हलका आहार घेतल्यास साखरेचे प्रमाण संतुलित राहते – योगासने आणि ध्यानधारणा या गोष्टी मधुमेहापासून बचाव करतात हे लक्षात ठेवावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment