मुख्यमंत्र्यांचा यापुढे अपमान सहन करणार नाही – नारायण राणे

rane
मुंबई – महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली असून महाराजांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सोलापूरमध्ये अपमान करण्याचा प्रयत्न केला. पण यापुढे असा प्रयत्न केल्यास आम्ही ते सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा उद्योगमंत्री व विधानसभा निवडणुक प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांनी भाजपला दिला.

येत्या 1 सप्टेंबॉरपासून मुंबईतील हुतात्मा चौकातून ज्योत पेटवून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे नारायण राणे यांनी आज दुपारी 4 वाजता एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. प्रत्येक जिल्ह्यात ही ज्योत घेऊन कोणत्या मुद्यांवर निवडणूक लढविणार आहोत याची माहिती आमचे कार्यकर्ते देतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या १०५ हुताम्यांनी बलिदान दिले त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन भाजपविरोधात प्रचाराची राळ उडवू असे जाहीर केले.

आघाडी सरकारने मागील १५ वर्षात मेट्रो, मोनोरेल, आयटी सीटी, उद्योग, रोजगार, मुंबईसह वेगवेगळ्या शहरात बांधलेले उड्डाणपूल यासह आमच्या आघाडी सरकारने केलेली सर्व विकासाकामे आम्ही जनतेसमोर मांडू. या विकासकामांच्या जोरावर राज्यातील जनता आम्हाला नक्कीच पुन्हा निवडून देईल, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला.

Leave a Comment