भीषण आगीत ३३ जणांचा होरपळून मृत्यू

bus
काहीरा – इजिप्तमधील दक्षिण सिनाई भागातील महामार्गावर दोन पर्यटन प्रवासी बसच्या झालेल्या धडकेनंतर लागलेल्या आगीत ३३ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 41 प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

या दोन्ही बसमध्ये एकूण ८० प्रवासी होते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता असल्याचे येथील आरोग्य मंत्रालयाचे सचिव मोहम्मद लशीन यांनी सांगितले. घटनास्थळी ३० अॅंब्युलंस पाठविण्यात आल्या असून बातमी लिहीपर्यंत या अपघातातील सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

Leave a Comment