पुणे मेट्रोचे राजकारण थांबविण्याचा भाजपचा प्रयत्न

naidu
मुंबई- पुणे मेट्रोचा प्रस्ताव नागपूर मेट्रोच्या आधी पाठवूनही केंद्राने तो मंजूर केल्याने निर्माण झालेले राजकारण थांबविण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला असून आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी भेट घेऊन पुणे मेट्रोसह मुंबईतील मेट्रो फेज-2 व मेट्रो फेज-3 याबाबत माहिती घेतली. पुणे मेट्रोला तीन दिवसात मंजूरी देऊ असे नायडू यांनी कालच पत्रकारांना नागपूरात सांगितले होते.

नागपूर मेट्रोचे भूमिपूजन काल सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व नगरविकासमंत्री नायडू यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थितीत होते. यामागे मोदींच्या कार्यक्रमात विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची हुर्यो उडविली जात असल्याचे कारण असले तरी मुख्यमंत्र्यांनी पुणे मेट्रोचा प्रस्ताव आधी देऊनही नागपूर मेट्रोला मंजूरी देऊन भाजप व नितीन गडकरी राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच पुणे मेट्रोबाबत राज्य सरकारच्यावतीने कोणतीही त्रुटी ठेवली नसल्याचे म्हटले होते.

Leave a Comment