कोकण आणि मध्य रेल्वेच्या वादात खोळंबली डबलडेकर

double-deccar
मुंबई – आजपासून खास गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर ‘डबलडेकर’ रेल्वेला सुरवात करण्यात आली. मात्र या गाडीला पहिल्याच दिवशी कोकण आणि मध्य रेल्वेच्या वादाला समोरे जावे लागल्या त्यामुळे एकतास रोहयातच गाडीला खोळबूंन राहावे लागले. वाद संपूष्टात येताच या गाडीचा पुढचा प्रवास सुरू झाला.

कोकण रेल्वेमार्गावरून महाराष्ट्रात पहिलीच डबलडेकर एक्स्प्रेस सुरू होत असल्याने सर्वांनाच त्याची उत्सुकता होती. बर्‍याच हौशी लोकांनी या गाडीत पहिल्यांदाच बसायला मिळावे म्हणून आरक्षण करून ठेवले होते. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोवा या स्थानकादरम्यान ही गाडी धावणार होती. आज सकाळी ५.३० वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघाली. पहिलाच दिवस असल्याने गाडी प्रवाशांनी भरलेली होती. ठाणे आणि पनवेल असे दोन स्थानकांवर गाडी थांबल्यानंतर या गाडीला चिपळूणला थांबा आहे. रत्नागिरीच्या दिशेने सुसाट निघालेल्या गाडीला मात्र रोहयातच ब्रेक लागला. जवळपास रोहा स्थानकात सकाळी ८वाजून ४० मिनिटांनी आलेली गाडी ९ वाजून ५४ मिनिटांपर्यंत थांबली होती.

डबलडेकरच्या चालकाने रोहापर्यंत गाडी नेऊन मध्य रेल्वेची हद्द रोहयापर्यंतच आहे असे सांगून इंजिन सोडले. रोहयापुढे कोकण रेल्वेच्या चालकाने गाडी न्यावी, असे सांगितल्यामुळे गाडी रोहा स्थानकातच थांबविली. डबलडेकरच्या पहिल्या प्रवासाला गालबोट लागू नये म्हणून तातडीने कोकण रेल्वे अधिकार्‍यांनी मध्य रेल्वे प्रशासनाची संवाद साधला आणि पर्यायी चालक आमच्याकडे नाही असे सांगत त्याच चालकाने गाडी पुढे न्यावी अशी विनंती मध्य रेल्वेला केली. प्रवाशांचा उत्साह पाहता आणि डबलडेकरचा पहिलाच प्रवासाला खोळंबा नको म्हणून चालकही पुढील प्रवासाकरीता तयार झाला आणि गाडीचा पुढील प्रवास सुरू झाला.

Leave a Comment