मोनाको कोट्याधीशांचा स्वर्ग

monaka
मोनाको हे शहर कोट्याधीशांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले जगातील पहिले शहर ठरले आहे. लंडनच्या वेल्थ इनसाईट आणि वेल्थ मॅनेजमेंट स्पिअर्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब लक्षात आली आहे. या शहरात दर तीन माणसांमागे १ कोट्याधीश आहे. या शहरात कोट्याधीशांची संख्या इतकी प्रचंड असण्यामागे हे शहर करदात्यांसाठी टॅकस हेवन म्हणजे कराचा जाच नसलेले शहर हे मुख्य कारण आहे.

स्वित्झरर्लंडमधील झुरीच आणि जिनिव्हा ही शहरे कोट्याधीशाच्या लोकसंख्येनुसारच्या टक्केवारीत दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक कोट्याधीश आहेत यावर या शहरांचे मानांकन केले गेले आहे. सर्वेक्षण कंपनीचे प्रमुख ऑलिव्हर विलियम्स यांच्या म्हणण्याप्रमाणे या शहरातील करप्रणाली श्रीमंताना आकर्षून घेण्यास कारणीभूत आहे. यामुळे या शहारातून खासगी बँकाही अधिक संख्येने आहेत.

चवथ्या नंबरवर न्यूयॉर्क, त्यापाठोपाठ फ्रँकफर्ट, लंडन, ऑस्लो, सिंगापूर, अॅमस्टरडॅम आणि फ्लोरिडा या शहरांचा पहिल्या दहा शहरांत समावेश आहे. सर्वेक्षणात असेही दिसून आले की लंडन हे शहर कोट्याधीशांना तेथील राजकीय स्थैर्य आणि परंपरा यामुळे अधिक आवडते.

Leave a Comment