मुंबई पोलिसांची न्यायालयात कबुली; गहाळ झाली महत्वाची कागदपत्रे

salman9
मुंबई : आज हिट अँड रन केसच्या सुनावणी दरम्यान एक धक्कादायक माहिती उघडकीस समोर आली असून बॉलीवूड स्टार सलमान खानच्या या हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची कबुली मुंबई पोलिसांनी आज न्यायालयात दिली आहे.

या प्रकरणातील ६३ पैकी फक्त ७ साक्षीदारांच्या जबाबाची मूळ प्रत पोलिसांकडे असून उर्वरीत ५६ साक्षीदारांच्या जबाबाची प्रत हरवल्याची माहिती आज मुंबई पोलिसांनी न्यायालयाला दिली आणि आश्चर्याची बाब अशी की पोलिसांनी ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशीची सविस्तर नोंद झालेली स्टेशन डायरीदेखील हरवल्याचे सांगितले आहे. न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्त करून या प्रकरणातील सर्वात पहिले तपास अधिकारी किसन सिंघडे यांना नोटीस पाठवून 12 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई पोलिसांवर याआधीच सलमानला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दाग लागला असून आता अशा हलगर्जीपणामुळे हे प्रकरण लांबत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment