कार्बनचा टाईटेनियम सेल्फी स्मार्टफोन आला

mobile
भारतातील टॉपच्या पाच स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या कार्बनने टाईटेनियम एस १९ हा सेल्फि स्मार्टफोन बाजारात आणला आहे याची किंमत आहे ८९९९ रूपये. या फोनला ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये व्हॉईस बेस्ड कॅप्चर फिचर ( क्लिक) दिले गेले असून त्यामुळे केवळ आवाजाने फोटो काढता येणार आहेत.

पाच इंचाचा आयपीएस डिस्प्ले एचडी स्क्रीन, अँड्राईड ४.२.२ किटकॅट, ८ जीबी इंटरनल मेमरी, ती ३२ जीबी पर्यंत वाढविता येण्याची सुविधा, डयुअल सिम, वायफाय, ब्लूटूथ, यूएसबी कनेक्टीव्हीटी अशी फिचर्स या फोनमध्ये आहेत. तसेच यात ओजीएस म्हणजे वन ग्लास सोल्युशन तंत्राचा वापर केला गेला आहे. यामुळे स्क्रीन लहान मोठा करण्यास मदत मिळते.

Leave a Comment