अॅमेझॉनच्या ड्रोन डिलिव्हरीची सुरवात भारतात

drone
अमेरिकेची बडी ई रिटेलर कंपनी अॅमेर्झानने त्यांच्या ड्रोन डिलिव्हरी पार्सल सेवेचे लॉचिंग पॅड म्हणून भारतातील मुंबई आणि बंगलोर शहरांची निवड केली असून ही सेवा ऐन खरेदीचा काळ असलेल्या दिवाळीपासून सुरू होणार असल्याचे समजते. मुंबई आणि बंगलोर येथे कंपनीची गोदामे आहेत व त्यामुळे या दोन शहरांपासून ही सेवा सुरू केली जाणार आहे असे सांगितले जात आहे.

अॅमेझॉन या सेवेमार्फत अडीच किलो पर्यंतची पॅकेट ड्रोन डिलिव्हरीने ग्राहकांना देणार आहे. विशेष म्हणजे अॅमेझॉनतर्फे ग्राहकांना पुरविल्या जात असलेल्या वस्तूंपैकी ८६ टक्के वस्तू याच वजनाच्या मर्यादेत असतात. या सेवेसाठी अमेरिकेऐवजी भारताची निवड करण्यामागे देशात अजून मानवरहित हवाई वाहन वापरासंदर्भात कोणतेच विशेष कायदे नाहीत हे आहे. अमेरिकेत मात्र कंपन्यांना यूएव्ही अथवा ड्रोनचा आऊटडोअर वापर करण्यावर निर्बंध आहेत.

ही सेवा भारतात सुरू झाली तर अॅमेझॉन ग्राहकांना त्यांनी मागविलेल्या वस्तूंचा पुरवठा दीड तास ते तीन तासात करू शकणार आहे. अर्थात सध्या ही सेवा निवडक ग्राहकांनाच उपलब्ध होऊ शकणार आहे. मात्र त्यामुळे भारतातील नंबर १ ची ई रिटेलर कंपनी फ्लिटकार्टपुढे मोठेच आव्हान उभे राहणार आहे.

Leave a Comment