अमेरिकेने जाहीर केले हक्कानी नेत्यांसाठी ३ कोटी डॉलरचे बक्षिस

haqqani
वॉशिंगटन : अमेरिकेने दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या पाच मोठ्या नेत्यांची माहिती देणाऱ्याला सुमारे ३ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले असून या दहशतवादी संघटनेवर अफगाणिस्तानातील अनेक नागरिक आणि नाटोच्या सैनिकांच्या हल्ल्याचा आरोप आहे.

पाकिस्तान आधारित हक्कानी नेटवर्क तालिबानशी जोडला गेला असून अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी २०१२ मध्ये हक्कानी संघटनेला दहशतवादी नेटवर्क घोषित केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अजीज हक्कानी, खलील अल-रहमान हक्कानी, याहया हक्कानी आणि अब्दुल रऊफ जाकीर यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना अमेरिकेच्या न्याय कार्यक्रमाच्या पुरस्कारांर्गत परराष्ट्र विभाग ५०-५० लाख डॉलरचे बक्षीस देणार आहे. तर १ कोटी डॉलरचे बक्षीस या समूहाचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्याबाबत सूचना देणार असल्याची घोषणा केली आहे.

हक्कानी नेटवर्कचे संस्थापक जलालुद्दीन यांचा मुलगा सिराजुद्दीन हा असून त्याने २००८मध्ये काबुलच्या सेरेना हॉटेलवर हल्ल्याचा कट रचला होता. या हल्ल्यात एक अमेरिकन नागरिक आणि पाच इतर जणांचा मृत्यू झाला होता. सरकारने २००८मध्ये त्याला विशेष दहशतवादी घोषित केले होते.

Leave a Comment