शिओमी एमआय ३ – दोन सेकंदात सोल्ड आऊट

xiaomiflipkart
चीनी कंपनीच्या शिओमी एमआय ३ स्मार्टफोनने सलग पाचव्यांदा विक्रीचे रेकॉर्ड स्थापन केले आहे. भारतात फ्लिपकार्टवर या कंपनीचे १५ हजार स्मार्टफोन अवघ्या दोन सेकंदात विकले गेले आहेत. भारतीय ग्राहकांच्या या स्मार्टफोनवर अक्षरशः उड्या पडत आहेत. पाचव्या लॉटच्या विक्रीची घोषणा कंपनीने पूर्वीच केली होती. त्यानुसार आर्नलाईन किरकोळ विक्री करणार्याच फ्लिपकार्ट वर अनेकांनी आपल्या कार्टमध्ये या फोनची नोंदणी करून ठेवली होती.फोन विक्रीसाठी उपलब्ध होताच ज्यांच्या कार्टवर अगोदरच नोंदणी होती त्यांना ते दिले गेले.

अर्थात यामुळे ऑनलाईन खरेदी करू पाहणार्‍या ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. फ्लिपकार्ट वेबसाईटवरही एकचवेळी अनेकांनी गर्दी केल्याने कांही काळ वेबसाईट जॅम झाली. मागच्या विक्रीच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. शिओमीचा पहिला लॉट अवघ्या ३९ सेकंदात विकला गेला होता व ते एक रेकॉर्डच होते.

Leave a Comment