मुंबईचा गोलीवडा देशात आणखी ३०० स्टोअर्स उघडणार

vada-pav
मुंबई- महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे सर्व थरातील जनतेचा आवडता होऊन राहिलेला वडा पाव आजही लोकप्रियता टिकवून आहे. या वडापावपासून प्रेरणा घेऊन मुंबईत सुरू झालेल्या गोली वडा पाव या तप्तर सेवा रेस्टॉरंटने यात्या २ वर्षात देशभरात आणखी ३०० स्टोअर्स सुरू करण्याची तयारी चालविली आहे. उत्तर प्रदेश व दिल्लीत येत्या २ वर्षात १०० स्टोर्स उघडली जात असल्याचे संस्थापक व सीइओ वेंकटेश अय्यर यांनी सांगितले.

मुंबईत एका रेस्टॉरंटपासून सुरवात झालेली ही चेन सध्या देशातील १६ राज्यातील ६० शहरात जवळपास ३०० स्टोअर्स चालवित आहे. येत्या काही महिन्यात पंजाब आणि कोलकाता येथे ३० ते ४० सेंटर सुरू केली जाणार आहेत. अय्यर सांगतात मॅकडोनल्ड व डोमिनो परदेशातून येऊन भारतात विस्तार करू शकत असतील तर आम्ही देशभरात विस्तार का करू शकणार नाही असा विचार करून ही साखळी सुरू केली जात आहे. आजही आमच्याकडे देशभरातून स्टोअर सुरू करण्याबाबत विचारणा केली जात आहे. आम्ही सर्वेक्षण करतो आहोत व त्यानुसार कुठे किती स्टोअर्स सुरू करायची याचा निर्णय घेणार आहोत. छत्तीसगढमध्ये २५ स्टोअर्स सुरू आहेत तेथे आणखी स्टोअर्स सुरू करणार आहोत.

पारंपारिक वडापाव सोबतच गोली वडा पाव मध्ये अनेक नवीन प्रयोग आणि नवीन कॉबिनेशन ट्राय केली गेली आहेत आणि ती सर्वच लोकांना भावली आहेत. येथील नेहमीच्या वडापाव प्रमाणेच मका पालक, आलू टिक्की, चीज वडा, शेजवान वडा, मिकस व्हेज वडा पाव, मसाला वडा पाव असे अनेक प्रकार खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Leave a Comment