महिला लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे न्यायाधीश निलंबित

justice
मुंबई – मुंबईतील सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाचे लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे निलंबन करण्यात आले असून यापूर्वी अनेक न्यायाधीशांवर अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे न्यायदानाचे काम करणारेच असे कृत्य करु लागल्यास सर्व सामान्य पीडीतांना न्याय देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईतील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.पी.गायकवाड यांना महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. न्यायाधीश गायकवाड यांनी माझं लैंगिक शोषण केल्याचा आरोप, कर्मचारी महिलेने केला होता. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाने ही कारवाई केली.

गायकवाड दोषी आढळल्यास त्यांच्यावर एमपीएससीच्या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार शालिनी फणसाळकर-जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Leave a Comment