इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंची चौकशी होणार नाही

mudgul
नवी दिल्ली – निवृत्त न्यायाधीश मुकूल मुदगल समितीने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि अन्य घोटाळयांची चौकशी करणा-या इंग्लंडला जाऊन भारतीय खेळाडूंची चौकशी करणार नसल्याचे स्पष्ट केले.

इंग्लंडला जाऊन भारतीय खेळाडूंची चौकशी करण्याचा समितीतील कोणत्याही सदस्याचा कोणताही हेतू नसून असे केल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होऊ शकतो याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे असे समितीने म्हटले आहे.

मुकूल मुदगल समिती इंग्लंडला जाऊन भारतीय खेळाडूंची चौकशी करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. त्यापार्श्वभूमीवर बीसीसीआयने मुदगल समितीच्यावतीने निवेदन प्रसिध्द करुन, अशी कोणतीही चौकशी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

मुदगल समितीच्यावतीने बीसीसीआयने निवेदन जारी करुन ही माहिती दिली आहे. समितीच्या सदस्यांनी आयसीसीचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन आणि त्यांचा जावई गुरुनाथ मय्यपन यांच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचेही निवेदनातून स्पष्ट केले आहे. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपा प्रकरणी मागच्यावर्षी मय्यपनला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

Leave a Comment