विचित्र आकाराची घरे आहेत नेदरलँडमध्ये

netherland
रॉटरडॅम हे नेदरलँड्स देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर असून नेदरलँड्सच्या पश्चिम भागात झाउड-हॉलंड प्रांतात वसलेल्या रॉटरडॅम येथील बंदर युरोपातील सर्वात मोठे व शांघाई खालोखाल जगातील दुसर्‍या क्रमांकाचे वर्दळीचे असून नेदरलँडच्या रॉटरडॅम शहरात ओव्हरब्लॉक कॉलनीत काही विचित्र घरे बांधली आहेत. जी पाहायलासुद्धा पैसे मोजावे लागतात. या घराचे आर्किटेक बाहेरून विचित्र दिसते. मात्र ही घरे खूप खास आहेत. एका रांगेत वसलेली क्यूबच्या आकाराची बनलेली ही घरे एखाद्या आश्‍चर्यापेक्षा कमी नाही.

नेदरलँडचे रिहाइशी हे एक प्रसिद्ध क्षेत्र आहे. या शहरातील ही घरे वास्तू शिल्पकाराचे शानदार नमुना आहे. याठिकाणी एकूण ३८ घरे आहेत. ही सर्व घरे एकमेकांना जोडलेली आहेत. या घराचे सौदर्यं प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतात. या क्यूबसारख्या घरांमध्ये निर्सगाची हवा आणि प्रकाश भरपूर येईल अशी सुविधा केली आहे. म्हणूनच या क्यूब वजा घरांना, लोकांना पाहता यावे यासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment